प्रसारमाध्यम l सुनंदा नाईक
भाजपा युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांचा वाढदिवस आज कोल्हापुरात विविध समाजोपयोगी उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. बॅनर, पोस्टर आणि हारतुरे यावरील खर्च टाळून सामाजिक बांधिलकी जपणारे उपक्रम राबवावेत, असे आवाहन कृष्णराज महाडिक यांनी पूर्वीच कार्यकर्त्यांना केले होते. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
कृष्णराज महाडिकप्रेमी, धनंजय महाडिक युवाशक्ती आणि भाजपा युवा मोर्चाच्यावतीने दिवसभर विविध सेवाभावी उपक्रम राबवण्यात आले. करवीर तालुक्यातील शिये येथील भागीरथी महिला संस्थेच्या कार्यालयात दिव्यांगांसाठी ६ व्हीलचेअर, ६ स्टिक आणि अन्य साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी संजय गांधी निराधार योजना सदस्य मारुती बुवा, करवीर पंचायत समिती सदस्य जयसिंग काशीद, दत्तात्रय चौगुले, अनिल जाधव, बाजीराव सातपुते, अमर उरुणकर, शिवानी पाटील, संगीता खाडे, पुष्पा पवार आणि अर्पिता जाधव उपस्थित होते.
शिये येथील करुणालय संस्थेत एचआयव्हीग्रस्त मुलांना खाऊ वाटप करण्यात आले. संस्थेचे आनंद बनसोडे यांनी संस्थेच्या गरजा मांडत मदतीचे आवाहन केले. भाजपा पदाधिकाऱ्यांनी मुलांशी संवाद साधून त्यांना खाऊचे वाटप केले.
उद्यमनगर येथील पांजरपोळ संस्थेत जनावरांना दोन ट्रॉली चारा देण्यात आला. तसेच किरण शिराळे फाउंडेशन आणि श्रीराम युवा प्रतिष्ठानच्यावतीने १०० कलिंगडे, २५ डझन अननस आणि ३० डझन केळी जनावरांना खाऊ घालण्यात आली. सिद्धार्थ शिराळे, वैभव राऊत, ओंकार म्हेतर, अथर्व जाधव, सिद्धांत जिरगे, शिवतेज देसाई, गौरव सरनाईक, तनिष्क पुरवंत आणि विवेक पाटील यांनी यात सहभाग घेतला. कार्यकर्त्यांनी यावेळी गोरक्षणाची शपथ घेतली. श्री गायत्री सेवाभावी संस्थेचे सुचित हिरेमठ, श्रीधर पाटील, शंभूराज पाटील, निखिल माने आणि निलेश खरबडे यांनीही जनावरांना चारा दिला.
सीपीआर चौकात कोल्हापुरी थाळीच्या माध्यमातून उदय प्रभावळे यांच्या अन्नदान उपक्रमाला भाजपा युवा मोर्चा कोल्हापूर महानगरने बळ दिले. रुग्णांचे नातेवाईक, फिरस्ते आणि गरजूंना अन्नदान करण्यात आले. जिल्हाध्यक्ष विश्वजीत पवार, सरचिटणीस वल्लभ देसाई, अनिकेत अतिग्रे, जयेश पाटील-घरपणकर, भूषण कानकेकर, अभिषेक भोसले, तलहा मणेर, रोहित कारंडे, देवयानी पाटील, पृथ्वीराज पुरोहित आणि अनिरुद्ध भुर्के उपस्थित होते.
रेल्वे स्टेशन परिसर, बस स्टॉप आणि फुटपाथवरील गरजूंना १०० छत्र्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी विश्वजीत पवार, वल्लभ देसाई, अनिकेत अतिग्रे, जयेश घरपणकर, तलहा मणेर, भूषण कानकेकर, अनिकेत सोलापूरे, पंकज बारड, अभिषेक भोसले, समर्थ चिले, देवयानी पाटील, निरंजन घाडगे, ऋषिराज पाटील, रोहित गोते, इब्राहिम मुजावर, यश उलपे, पृथ्वीराज पुरोहित आणि योगिराज सुतार उपस्थित होते.
सायंकाळी भाजप कार्यालयात शुभेच्छांचा वर्षाव झाला. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील, महापौर रूपाराणी निकम, स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव, राहुल चिकोडे, नगरसेवक विजयसिंह देसाई, माधुरी नकाते, विजयसिंह खाडे-पाटील, सुनील वाडकर, प्रिया तेंडुलकर, माधुरी व्हटकर, अभिजित खतकर, जिल्हा परिषद सदस्य काकासाहेब सावर्डेकर, नामदेव वाईंगडे, हैबतराव नाईक-निंबाळकर यांच्यासह अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.
तसेच चंद्रकांत संकपाळ, तानाजी फाले, बाबा जांभळे, शिवछत्रपती पुरस्कार विजेते शिवाजीराव पाटील, उत्तम बांडागळे, डॉ. अजय चौगुले, पृथ्वीराज मोरे, अभय तेंडुलकर, विजय महाडिक, अमर साठे, संग्राम पाटील, उद्योजक राजेश व्हटकर, रवींद्र कानकेकर, महेश चौगुले, राजसिंह शेळके, अजित ठाणेकर, किरण नकाते, नीलेश देसाई, विजय सूर्यवंशी, रवींद्र मुतगी, सिटीझन फोरमचे प्रसाद जाधव, शिवानंद स्वामी, अनिरुद्ध कोल्हापुरे, गजानन तोडकर, सांगलीचे शांतीनाथ कर्वे, नांदेडचे सलीम देशमुख, यवतमाळचे सुरजित गुप्ता, अजिंक्य हणबर, सरपंच शांताराम कांबळे, सूरगोंडा पाटील, सुदर्शन उपाध्ये, भूषण गुरव, शरद पवार, अभिजीत सूर्यवंशी, दिलीप मैत्राणी, विश्वजित पोवार, संग्रामसिंह जरग, महाधुरळाचे संपादक गुरुबाळ माळी, भाजप जिल्हा उपाध्यक्ष भरत काळे, गणेश खाडे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
सायंकाळी मिरजकर तिकटी येथे नशामुक्त महाराष्ट्र उपक्रमांतर्गत दुधवाटप करण्यात आले. अंमली पदार्थांच्या वाढत्या विळख्यातून तरुणांना दूर ठेवण्यासाठी हा उपक्रम दिशादर्शक असल्याचे कृष्णराज महाडिक यांनी सांगितले. “राज्यातील तरुणांनी व्यसनमुक्त जीवन जगावे, हा संदेश या उपक्रमातून देण्याचा प्रयत्न आहे,” असे ते म्हणाले.






