मनसेकडून राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त 580 वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ…

0
6
Google search engine

कोल्हापूर : राजसाहेब ठाकरे यांच्या 58 व्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना, कोल्हापूर शहर जिल्ह्यातर्फे विविध विधायक उपक्रम राबविण्यात आले.

पहाटे करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी मंदिरात राजसाहेबांच्या दीर्घायुष्यासाठी अभिषेक करण्यात आला. तसेच 580 वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ आनंदराव दिंडोर्ले सांस्कृतिक भवन, साने गुरुजी येथून करण्यात आला.

याशिवाय भाऊजी टॉकीज परिसरातील प्रशांत पेट्रोल पंप आणि साळुंखे नगर येथील कोंडूस्कर ऑटो सेंटर येथे दिवसभर पाच रुपये स्वस्त दरात पेट्रोल देण्याचा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांना मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती लाभली.

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here