गुणवत्तेच्या जोरावर ‘गोकुळ’च्या दूध विक्रीत ४० दिवसांत दीड लाख लिटरची वाढ…

0
75
Google search engine

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ)च्या दर्जेदार दूध व दुग्धजन्य पदार्थांना ग्राहकांकडून वाढता प्रतिसाद मिळत असून, गेल्या ४० दिवसांत दैनिक दूध विक्रीत सुमारे एक ते दीड लाख लिटरची वाढ झाली आहे. सध्या गोकुळकडून पुणे, मुंबई, ठाणे, कोल्हापूर, सांगली तसेच कोकण विभागात दररोज १६ ते १६.५० लाख लिटर दूध विक्री होत आहे.

दूध संकलनापासून प्रक्रिया, पॅकिंग आणि ग्राहकांपर्यंत वितरणाच्या प्रत्येक टप्प्यावर गुणवत्ता व शुद्धतेला प्राधान्य दिल्यामुळे गोकुळच्या दूधासह तूप, लोणी, पनीर, दही, ताक, श्रीखंड, चीज, बासुंदी, गुलाबजाम आणि आईस्क्रीमसारख्या दुग्धजन्य पदार्थांनाही बाजारपेठेत सातत्याने चांगली मागणी मिळत आहे.

गोकुळचे मार्केटिंग विभागाचे व्यवस्थापक हणमंत पाटील यांनी सांगितले की, “गुणवत्ता हीच गोकुळची सर्वात मोठी ताकद असून, ग्राहकांना सुरक्षित, शुद्ध आणि दर्जेदार उत्पादने योग्य दरात उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. दूध उत्पादकांचा विश्वास, कर्मचारी, वितरक आणि ग्राहकांच्या सहकार्यामुळे गोकुळच्या उत्पादनांची मागणी सातत्याने वाढत आहे.” भविष्यातही गुणवत्तेत कोणतीही तडजोड न करता अधिकाधिक ग्राहकांपर्यंत गोकुळची उत्पादने पोहोचविण्यासाठी संघ प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here