दूध उत्पादक शेतकरी हेच गोकुळचे खरे बाप’ : आ. सतेज पाटील

0
40
Google search engine

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीने प्रचाराला वेग दिला आहे. आमदार सतेज पाटील यांच्या प्रमुख कार्यकर्त्यांची टीम जिल्हाभरातील ठरावधारकांना प्रत्यक्ष भेटून त्यांना निवेदन देत संवाद साधत आहे.या निवेदनातून ठरावधारकांचे अभिनंदन करताना गोकुळच्या स्थापनेपासूनच्या वाटचालीचा आढावा घेण्यात आला आहे. गोकुळचे शिल्पकार कै. आनंदराव पाटील-चुयेकर यांच्या कार्याचा उल्लेख करत, गेल्या पाच वर्षांत म्हशीच्या दुधाला १४ रुपये आणि गायीच्या दुधाला १० रुपये प्रतिलिटर दरवाढ देऊन दिलेला शब्द पाळल्याचा दावा करण्यात आला आहे.

निवेदनात दूध उत्पादक शेतकरी आणि महिला दूध उत्पादकांच्या कष्टांचा गौरव करत “दूध उत्पादक शेतकरी हेच गोकुळचे खरे बाप आहेत” असे नमूद करण्यात आले आहे. तसेच दूध उत्पादकांचा सन्मान, दुधाला अधिकाधिक दर मिळवून देणे आणि गोकुळची प्रगती कायम राखणे हीच आपली भूमिका असल्याचे सांगण्यात आले आहे.
येत्या निवडणुकीत गट-तट व पक्षीय भेद बाजूला ठेवून राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीला सहकार्य व आशीर्वाद देण्याचे आवाहन आ. सतेज पाटील यांनी निवेदनातून केले असून, गोकुळच्या विकासाची जबाबदारी समविचारी आघाडी निश्चितपणे पार पाडेल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली आहे.

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here