कोल्हापूर: उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा भाजपाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी, कोल्हापूरच्या वतीने विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. भाजपा जिल्हा कार्यालयात खासदार धनंजय महाडिक, जिल्हाध्यक्ष विजय जाधव, माजी प्रदेश सचिव महेश जाधव यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत याबाबत नियोजन करण्यात आले.
यंदाही वाढदिवसानिमित्त हार, पुष्पगुच्छ, जाहिराती, फ्लेक्स व मिठाई यांवरील खर्च टाळून ती रक्कम संवेदना सोशल फाउंडेशनमार्फत समाजोपयोगी कार्यासाठी देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यानिमित्त १० व ११ जून रोजी आरोग्य तपासणी शिबिर, वृक्षारोपण, स्वच्छता अभियान, फुटबॉल स्पर्धा आदी उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
मा. नाम. चंद्रकांतदादा पाटील हे गुरुवार, ११ जून रोजी सायंकाळी ५ ते ८ या वेळेत भाजपा जिल्हा कार्यालय, नागाळा पार्क येथे शुभेच्छा स्वीकारणार आहेत.






