खासदार धनंजय महाडिक यांच्या पाठपुराव्याला यश; दोन लाखांहून अधिक केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिलासा….

0
78
Google search engine

कोल्हापूर : केंद्रीय शासकीय आरोग्य योजना (CGHS) अंतर्गत कोल्हापूरातील सेलक्युअर कॅन्सर सेंटर आणि सनराईज हॉस्पिटल यांचा समावेश करण्यात आला आहे. खासदार धनंजय महाडिक यांनी संसदेत तसेच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडे केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आल्याने हा निर्णय झाला असून, याचा लाभ कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रातील दोन लाखांहून अधिक केंद्रीय कर्मचारी, सेवानिवृत्त कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना होणार आहे.

यापूर्वी या योजनेअंतर्गत उपचारासाठी केंद्रीय कर्मचाऱ्यांना पुणे किंवा मुंबईला जावे लागत होते. आता कोल्हापूरमध्येच या दोन मान्यताप्राप्त रुग्णालयांमध्ये उपचाराची सुविधा उपलब्ध होणार आहे. या यशस्वी पाठपुराव्याबद्दल अखिल भारतीय डाक कर्मचारी संघटनेच्या वतीने खासदार धनंजय महाडिक यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी संघटनेचे पदाधिकारी तसेच आनंद भोगडे, मोरेश्वर देशपांडे, अभिलाष पोवार, गोपाळ देशपांडे, वल्लभ मैंदरकर, राजेंद्र पाटील, ज्योत्स्ना माकणकर, देवेंद्र कवडे, साक्षी बचाटे, प्रतीक्षा पाटील, रूपाली तांबवेकर आदी उपस्थित होते.

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here