आयसीएआय कोल्हापूरतर्फे ‘उत्थान MSME महोत्सव 2026’ चे आयोजन…2 जुलैला भव्य महोत्सव

0
70
Google search engine

कोल्हापूर : The Institute of Chartered Accountants of India (आयसीएआय) कोल्हापूर शाखा आणि MSME and Startup Committee यांच्या संयुक्त विद्यमाने ‘उत्थान MSME महोत्सव 2026’ चे आयोजन 2 जुलै 2026 रोजी The Pavilion Hotel येथील मधुसूदन हॉलमध्ये करण्यात आले आहे.

या एकदिवसीय महोत्सवात MSME क्षेत्रासाठी शासकीय योजना, वित्तपुरवठा, अनुदान, उद्योगवाढीच्या संधी आणि नेटवर्किंग यावर तज्ञांचे मार्गदर्शन होणार आहे. अध्यक्ष सीए आशिष सेवेकरी यांनी यावर्षीची थीम “SYNERGY” असल्याचे सांगत उद्योग, बँका आणि शासन यांच्यातील समन्वय अधिक मजबूत करण्याचा उद्देश असल्याचे स्पष्ट केले.
कार्यक्रमात प्रख्यात बिझनेस एक्स्पर्ट सीए चंदन लाहोटी मार्गदर्शन करणार असून देशभरातील मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.यावेळी सीए आशिष सेवेकरी, नितीन हारुगडे, आलोक शहा व राघवेंद्र बकरे उपस्थित होते.

सोबत दिलेला क्यू आर कोड स्कॅन करुन इच्छुकांनी या महोत्सवासाठी नोंदणी करावी.

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here