महिला व बालकल्याण समितीचा राखीव निधी वाढवण्याची मागणी ; महिलांच्या विकासासाठी अधिक निधीची गरज : दीपा ठाणेकर

0
17
Google search engine

कोल्हापूर : महिला व बालकल्याण समितीसाठी राखीव ठेवला जाणारा निधी अपुरा असल्याने तो वाढवावा, अशी मागणी समितीच्या उपसभापती दीपा ठाणेकर यांनी सहपालकमंत्री माधुरी मिसाळ यांच्याकडे केली. सध्याच्या शासन निर्णयानुसार महानगरपालिकेच्या निव्वळ महसुलाच्या ५ टक्के निधीची तरतूद महिला व बालकल्याण विभागासाठी केली जाते. मात्र, या निधीतून महिलांसाठी व बालकांसाठी असलेल्या सुमारे ७० योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे कठीण होत असल्याचे त्यांनी सांगितले.

कोल्हापूर महानगरपालिकेच्या अंदाजपत्रकात महिला व बालकल्याण समितीसाठी केवळ साडेपाच कोटी रुपयांची तरतूद होत असल्याचे निदर्शनास आणून देत, निव्वळ महसुलाऐवजी महानगरपालिकेच्या एकूण महसुलाच्या ५ टक्के निधीची तरतूद करण्याबाबत शासन स्तरावर कार्यवाही करावी, अशी मागणी ठाणेकर यांनी केली. यावेळी जिल्हाध्यक्ष विजय जाधव, नगरसेवक विजयसिंह खाडे-पाटील आणि माजी नगरसेवक अजित ठाणेकर उपस्थित होते.

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here