राज्यातील तब्बल ९६ वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले.

वादग्रस्त दत्ता कराळे यांची राज्य मानवी हक्क आयोगात बदली

0
44
Google search engine

प्रसारमाध्यम l दिग्विजय माळकर


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गृह विभागाने शुक्रवारी राज्यातील ९६ वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले. या बदल्यांमध्ये नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक दत्ता कराळे यांची राज्य मानवी हक्क आयोगात बदली झाल्याने विशेष चर्चा रंगली आहे. भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणामुळे कराळे वादाच्या केंद्रस्थानी आले होते.

गृह विभागाच्या आदेशानुसार भारतीय पोलिस सेवेतील ५२ आणि राज्य पोलिस सेवेतील ४४ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. मुंबई, पुणे, नाशिक, कोकण, कोल्हापूर आदी महत्त्वाच्या विभागांमध्ये मोठे फेरबदल करण्यात आले आहेत.

मुंबईचे सहपोलीस आयुक्त (गुन्हे) लखमी गौतम यांची विशेष पोलिस महानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्था) म्हणून नियुक्ती करण्यात आली. मनोज शर्मा यांची मुंबईचे सहपोलीस आयुक्त म्हणून बदली झाली असून महेश पाटील आणि परमजीत दहिया यांना पदोन्नती देण्यात आली आहे.

प्रमुख बदल्यांचा तक्ता

अधिकारी सध्याचे पद नवीन नियुक्ती
कृष्णा प्रकाश अप्पर पोलीस महासंचालक, फोर्स वन अप्पर पोलीस महासंचालक, प्रशिक्षण
दत्ता कराळे विशेष पोलीस महानिरीक्षक, नाशिक राज्य मानवी हक्क आयोग
प्रवीण पडवळ विशेष पोलीस महानिरीक्षक, प्रशिक्षण नाशिक परिक्षेत्र
लखमी गौतम सहपोलीस आयुक्त, मुंबई विशेष पोलीस महानिरीक्षक, कायदा व सुव्यवस्था
मनोज शर्मा विशेष पोलीस महानिरीक्षक सहपोलीस आयुक्त, मुंबई
सुवेझ हक विशेष पोलीस महानिरीक्षक, नियोजन सहपोलीस आयुक्त (प्रशासन), मुंबई
महेश पाटील अपर पोलीस आयुक्त, मुंबई विशेष पोलीस महानिरीक्षक (नियोजन)
परमजीत दहिया अपर पोलीस आयुक्त विशेष पोलीस महानिरीक्षक, एटीएस
सी. के. मीना विशेष पोलीस महानिरीक्षक, एटीएस विशेष पोलीस महानिरीक्षक, कोकण
संजय दराडे विशेष पोलीस महानिरीक्षक, कोकण सहपोलीस आयुक्त, पुणे
रंजन शर्मा सहपोलीस आयुक्त, पुणे विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर
सुनिल फुलारी प्रतीक्षेत विशेष पोलीस महानिरीक्षक, सीआयडी पूर्व
राजेश प्रधान आर्थिक गुन्हे, मुंबई विशेष पोलीस महानिरीक्षक, प्रशिक्षण
निशब मिश्रा सहपोलीस आयुक्त प्रशासन, मुंबई विशेष पोलीस महानिरीक्षक, फोर्स वन
जय कुमार सहपोलीस आयुक्त, नवी मुंबई विशेष पोलीस महानिरीक्षक, व्हीआयपी सुरक्षा
दीपक साकोरे अतिरिक्त पोलीस आयुक्त, नवी मुंबई सहपोलीस आयुक्त, नवी मुंबई
पंजाबराव उगले अपर पोलीस आयुक्त, गुन्हे ठाणे पोलीस गृहनिर्माण महामंडळ
एस. व्ही. पाठक अपर पोलीस आयुक्त प्रशासन, पुणे आर्थिक गुन्हे शाखा, पुणे
विनायक देशमुख अपर पोलीस आयुक्त, ठाणे नियंत्रक वैधमापन विभाग
ज्योती प्रिया मिंग प्रतीक्षेत अंमली पदार्थ विरोधी पथक
अनिल कुंभारे वाहतूक विभाग, मुंबई सहपोलीस आयुक्त, गुन्हे मुंबई
सत्य नारायण चौधरी कायदा व सुव्यवस्था सहपोलीस आयुक्त, वाहतूक मुंबई
गौहर हसन पोलीस उपायुक्त, सोलापूर पोलीस उपायुक्त, पुणे
अभयसिंग देशमुख राज्यपालांचे परिसहाय्यक पोलीस उपायुक्त, मुंबई
कुमार चिता पोलीस अधीक्षक, यवतमाळ पोलीस उपायुक्त, नागपूर
मोक्षदा पाटील एसआरपी महाराष्ट्र अतिरिक्त पोलीस आयुक्त
तेजस्वी सातपुते अतिरिक्त पोलीस आयुक्त गुन्हे, पुणे
Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here