डॉ. बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूट मध्ये इलेक्ट्रिक व्हेईकल प्रशिक्षण केंद्र कोल्हापुरात सुरू

0
31
Google search engine

कोल्हापूर : श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या डॉ. बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, ताराबाई पार्क येथे बजाज ऑटो लिमिटेडच्या CSR निधीतून उभारण्यात आलेल्या ‘सेंटर ऑफ एक्सलन्स इन इलेक्ट्रिक व्हेईकल्स’चे उद्घाटन आमदार रोहित पाटील यांच्या हस्ते झाले. पश्चिम महाराष्ट्रातील अशा प्रकारचे हे पहिलेच अत्याधुनिक इलेक्ट्रिक व्हेईकल प्रशिक्षण केंद्र आहे.

यावेळी बोलताना आमदार रोहित पाटील यांनी इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रातील वाढत्या रोजगार संधींचा उल्लेख करत हे केंद्र युवकांसाठी उपयुक्त ठरणार असल्याचे सांगितले. संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांनी उद्योग व शिक्षण यांच्यातील दरी कमी करण्यासाठी हे केंद्र महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल, असे मत व्यक्त केले.
सदर तीन महिन्यांचा प्रशिक्षण अभ्यासक्रम १२ वी (विज्ञान), आयटीआय आणि डिप्लोमा धारक विद्यार्थ्यांसाठी पूर्णपणे मोफत उपलब्ध असून विद्यार्थ्यांना इलेक्ट्रिक वाहनांची दुरुस्ती, देखभाल व आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. या उपक्रमासाठी बजाज ऑटो लिमिटेड, ग्लोबल टॅलेंट ट्रॅक (GTT) आणि संस्थेचे संयुक्त सहकार्य लाभले आहे.

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here