महाराष्ट्रात अवैध धंद्यांचा सुळसुळाट; सरकार अपयशी : राजू शेट्टी

0
30
Google search engine

कोल्हापूर (सुनंदा नाईक) : राज्यात अवैध धंद्यांना मोठ्या प्रमाणात ऊत आला असून पोलिस यंत्रणेला याची माहिती असतानाही प्रभावी कारवाई होत नसल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते Raju Shetti यांनी केला. शिवसेना शिंदे गटाचे आमदार Nilesh Rane यांनी सिंधुदुर्गमधील पोलिस यंत्रणेवर केलेल्या आरोपांचा संदर्भ देत शेट्टी यांनी राज्य सरकारवर टीका केली.

महाराष्ट्राची वाटचाल ‘उडता पंजाब’कडे होत असल्याचा पुनरुच्चार करत, मटका, अवैध दारू, गांजा आणि अमली पदार्थांच्या व्यवसायातून मोठ्या प्रमाणात हप्तेवसुली होत असल्याचा आरोप त्यांनी केला. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवैध व्यवसाय राजरोसपणे सुरू असून सरकारने याची गंभीर दखल घ्यावी, अशी मागणीही शेट्टी यांनी केली.

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here