Google search engine

प्रसारमाध्यम l सुनंदा नाईक

काल धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त वाघापूर येथील नागरिकांनी पारंपरिक पद्धतीने भव्य मिरवणूक काढण्यासाठी प्रशासनाकडे परवानगी मागितली होती. मात्र कोणतेही ठोस व समाधानकारक कारण न देता ही परवानगी नाकारण्यात आली, ही अत्यंत संतापजनक व शिवप्रेमींच्या भावना दुखावणारी बाब आहे.

धर्मासाठी, स्वराज्यासाठी आणि हिंदवी साम्राज्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती मिरवणुकीलाच जर प्रशासन अडवणार असेल, तर हा निर्णय नेमका कोणाच्या दबावाखाली घेण्यात आला? असा संतप्त सवाल आज वाघापूरसह संपूर्ण परिसरातील नागरिक विचारत आहेत.

भुदरगड पोलीस ठाण्याने आणि संबंधित पालकमंत्र्यांनी तात्काळ जनतेसमोर येऊन स्पष्ट करावे की —

* मिरवणुकीस परवानगी का नाकारली?
* कोणत्या नियमांच्या आधारे हा निर्णय घेण्यात आला?
* शिवप्रेमींच्या भावना दुखावण्याचा अधिकार प्रशासनाला कोणी दिला?

लोकशाहीमध्ये जनतेच्या धार्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक परंपरांचा सन्मान राखणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. जर शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने मिरवणूक काढण्याची तयारी असतानाही परवानगी नाकारली जात असेल, तर हा निर्णय जनतेच्या भावना दडपण्याचा प्रयत्न असल्याचे दिसून येते.

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here