प्रसारमाध्यम l दिग्विजय रा. माळकर
३ फेब्रुवारी रोजी खोपोलीजवळ गॅस टँकर पलटी झाल्यामुळे मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतूक तब्बल ३२ तास विस्कळीत झाली. आडोशी बोगद्याजवळ झालेल्या या अपघातानंतर २० ते २२ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. अनेक प्रवाशांना पाणी, अन्न आणि इतर मूलभूत सुविधांशिवाय रस्त्यावरच थांबावे लागले.
दरम्यान, टोल सवलतीबाबत IRB Infrastructure कडून सविस्तर अहवाल मागवण्यात आला आहे. निर्देशानंतरही टोल वसुली सुरू का राहिली याबाबत स्पष्टीकरणही मागण्यात आले आहे. स्वयंचलित प्रणालीमुळे काही व्यवहार झाले असावेत, अशी शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
या प्रकरणात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही टोल रक्कम परत करण्याची मागणी केली होती. प्रशासनाने परतफेड प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने पूर्ण केली जाईल, तसेच भविष्यात अशा परिस्थितीत अनावश्यक कपात टाळण्यासाठी तांत्रिक यंत्रणा अधिक सक्षम केली जाईल, असे आश्वासन दिले आहे.








