गोकुळ’तर्फे वारकऱ्यांना लोणंद व फलटण येथे साहित्य वाटप…

0
52
Google search engine

कोल्हापूर : महाराष्ट्राच्या संतपरंपरेचा अविभाज्य भाग असलेल्या श्री संत ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांच्या सेवेसाठी कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या., कोल्हापूर (गोकुळ) यांच्यावतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही सामाजिक बांधिलकी जपत सेवा उपक्रम राबविण्यात आला.

दि. १५ व १७ जुलै २०२६ रोजी सातारा जिल्ह्यातील लोणंद व फलटण येथे वारकऱ्यांना दूध पावडर, साहित्य ठेवण्यासाठीच्या कापडी पिशव्या, टोपी तसेच दिनदर्शिकांचे गोकुळच्या प्राधिकृत अधिकारी मंडळाचे सदस्य सागर बलकवडे, डॉ. चंद्रकांत परूळेकर, सुनिल धायगुडे यांच्या हस्ते मोफत वाटप करण्यात आले.

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here