अमली पदार्थांविरोधात पोलिसांचा मोठा अ‍ॅक्शन प्लॅन.. दोन महिन्यांत समूळ उच्चाटनाची ग्वाही

कोल्हापुरातील तरुणाई ड्रग्जच्या विळख्यात...

0
19
Google search engine

प्रसारमाध्यम l सुनंदा नाईक 

कोल्हापूर जिल्ह्यात वाढत्या अमली पदार्थांच्या विक्री आणि सेवनामुळे तरुणाई गंभीर विळख्यात अडकत असल्याची चिंता व्यक्त करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जिल्हा पोलिस प्रमुख निलोत्पल यांना निवेदन दिले. गांजा, चरस, ब्राऊन शुगर, हेरॉईन, मेथाम्फेटामाइन यांसारख्या अमली पदार्थांचे जाळे शहरी भागासह ग्रामीण भागातही वाढत असल्याचा आरोप करण्यात आला.

यावर जिल्हा पोलिस प्रमुख निलोत्पल यांनी येत्या दोन महिन्यांत अमली पदार्थांच्या विक्रीचे समूळ उच्चाटन करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याची ग्वाही दिली. हेल्पलाईन सुरू करून पोलिस यंत्रणा अधिक सतर्क केली जाणार असून कारवाईत हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशाराही त्यांनी दिला.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळात डॉ. बाळासाहेब पाटील, सचिन शिंदे, भिमगोंडा पाटील, विशाल चौगुले, दिग्विजय सूर्यवंशी आदी पदाधिकारी उपस्थित होते.

 

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here