Google search engine

प्रसारमाध्यम l सुनंदा नाईक 

 

सीआयआय पश्चिम विभागाचे अध्यक्ष तसेच ब्लू स्टार लिमिटेडचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक वीर एस अडवाणी यांनी विश्वासार्ह आणि लवचिक जागतिक पुरवठा साखळीत भारताला नेतृत्व करण्याची मोठी संधी असल्याचे सांगितले.

सीआयआय वार्षिक व्यापार परिषदेत ‘भूराजनीती, पुरवठा साखळ्या आणि धोरणात्मक लवचिकता’ या विषयावरील सत्रात ते बोलत होते. जागतिक पुरवठा साखळ्यांमध्ये वेगाने बदल होत असून केवळ खर्च आणि कार्यक्षमता नव्हे, तर विश्वासार्हता, लवचिकता, नवकल्पना आणि गती यांना अधिक महत्त्व प्राप्त होत असल्याचे त्यांनी नमूद केले.

श्री वीर एस अडवाणी, अध्यक्ष , सीआयआय पश्चिम विभाग अध्यक्ष , म्हणाले की, उद्योगक्षेत्र आता मजबूत आणि विश्वासार्ह सोर्सिंग नेटवर्क, तंत्रज्ञानाचा वाढता वापर आणि उत्पादनातील गती यावर भर देत आहे. पुरवठा साखळी व्यवस्थेची नव्याने पुनर्रचना होत असून खर्चाबरोबरच विश्वासार्हता आणि सातत्यालाही प्राधान्य दिले जात आहे.

गुणवत्ता, नवकल्पना आणि वेग यांवर लक्ष केंद्रीत करत स्वदेशीकरणाला चालना देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आधुनिक तंत्रज्ञानामुळे जागतिक उत्पादन आणि पुरवठा व्यवस्थेत मोठे बदल होत असून भारतासाठी जागतिक उत्पादन आणि पुरवठा भागीदार म्हणून उदयास येण्याची ही मोठी संधी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here