राजीव गांधींना सद्भावना दौड मधून अभिवादन

जिल्हा काँग्रेसचे आयोजन

0
170
Congress organized a goodwill rally in Kolhapur on Wednesday to mark the birth anniversary of Bharat Ratna former Prime Minister Rajiv Gandhi.
Google search engine
कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज

भारतरत्न माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त बुधवारी कोल्हापुरात काँग्रेसतर्फे सद्भावना दौड काढण्यात आली. यंदा ही दौड दिवंगत जिल्हा काँग्रेस अध्यक्ष आमदार पी. एन. पाटील यांच्या वारसांकडून न होता थेट विद्यमान जिल्हा काँग्रेस अध्यक्ष आमदार सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. त्यामुळे या खांदेपालटीची राजकीय चर्चा जिल्ह्यात रंगली आहे.

दरवर्षी पी. एन. पाटील यांच्या नेतृत्वाखाली सद्भावना दौड आयोजित केली जात असे. मात्र यंदा त्यांचे सुपुत्र राहुल पाटील आणि भाऊ राजेश पाटील यांच्या अजित पवार गटात प्रवेशाच्या घडामोडींमुळे ही जबाबदारी काँग्रेसकडे आली.
राजर्षी शाहू समाधी स्थळापासून या दौडीला सुरुवात झाली. माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी ज्योत प्रज्वलित करून दौडीचे उद्घाटन केले. “अमर रहे अमर रहे, राजीवजी गांधी अमर रहे” अशा घोषणा देत कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत ही दौड सीपीआर चौक, दसरा चौक, व्हीनस कॉर्नर, दाभोळकर कॉर्नर, वटेश्वर महादेव मंदिर मार्गे मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील राजीव गांधींच्या पूर्णाकृती पुतळ्यापर्यंत निघाली. तेथे पुष्पहार अर्पण करून गांधींना अभिवादन करण्यात आले.

पी. एन. पाटील यांचे विचार हेच काँग्रेसचे विचार असून त्यांचे कार्य पुढे नेण्यासाठी या दौडीचे आयोजन करण्यात आल्याचे ऋतुराज पाटील यांनी सांगितले. “आमदार सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही परंपरा पुढे नेली जाईल व दरवर्षी सद्भावना दौड सातत्याने आयोजित केली जाईल,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
या दौडीत माजी आमदार ऋतुराज पाटील, आनंद माने, सुर्यकांत पाटील बुद्धीहाळकर, सरलाताई पाटील, शहराध्यक्ष सचिन चव्हाण, बाळासाहेब सरनाईक, माजी उपमहापौर संजय मोहिते, बबन रानगे, दत्ता वारके, मधुकर रामाणे, दुर्वास कदम, विक्रम जरग, अर्जुन माने, राहुल माने, प्रविण केसरकर, ईश्वर परमार, रियाज सुभेदार, प्रताप जाधव सरकार, रवि आवळे, जय पटकारे, विनायक फाळके, फिरोज सौदागर, धनंजय सावंत, सुभाष बुचडे, तौफीक मुल्लाणी, मोहन सालपे आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले.
——————————————————————————————————————
Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here