कोल्हापूर : गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान शिवसेनेच्या स्वागत बूथसमोर महिलांशी गैरवर्तन केल्याप्रकरणी रविकिरण इंगवले यांच्यासह सुमारे ४० जणांवर दाखल असलेल्या विनयभंगाच्या गुन्ह्याचा तपास जलदगतीने पूर्ण करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी शिवसेना महिला आघाडीने केली आहे.
या प्रकरणी १६ सप्टेंबर २०२२ रोजी गुन्हा दाखल झाला असून, चार वर्षे उलटूनही ठोस कारवाई झालेली नसल्याचे महिला आघाडीचे म्हणणे आहे. घटनास्थळी पोलिसांनी केलेले व्हिडिओ रेकॉर्डिंग तसेच उपलब्ध इतर व्हिडिओ तपासून साक्षीदारांचे जबाब नोंदवावेत, अशी मागणी करण्यात आली.
शिवसेना महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी आज स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. महिलांच्या सन्मानाशी संबंधित प्रकरणात दिरंगाई न करता निष्पक्ष व जलद तपास करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.





