गोकुळची विश्वासार्हता आणि ताकद वाढवण्यासाठीच आमचा संघर्ष : सतेज पाटील

0
15
Google search engine

असळज : गोकुळ दूध संघ आणि कोल्हापूर जिल्हा बँक या दोन्ही सहकारी संस्था स्थिर व सक्षमपणे चालवणे, तसेच शेतकरी व दूध उत्पादकांच्या हिताला प्राधान्य देणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे, असे प्रतिपादन आमदार सतेज पाटील यांनी केले. गगनबावडा तालुका दौऱ्यात असळज येथे शेतकरी, दूध उत्पादक आणि ठरावधारकांच्या मेळाव्यात ते बोलत होते.

सहकाराच्या विकासाला वैयक्तिक स्वार्थापेक्षा प्राधान्य देत गोकुळ व जिल्हा बँकेची विश्वासार्हता आणि ताकद वाढवण्यासाठी हा संघर्ष असल्याचे पाटील यांनी सांगितले. स्वर्गीय आनंदराव पाटील-चुयेकर यांनी उभा केलेला सहकाराचा वारसा सर्वांना सोबत घेऊन पुढे नेण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

यावेळी गगनबावडा तालुक्यातील जिल्हा बँकेच्या विकास सेवा संस्था गटातील ७६ पैकी ५७ ठराव, तर गोकुळ दूध संघासाठी १३१ पैकी ९१ ठराव ठरावधारकांनी सतेज पाटील यांच्याकडे सुपुर्द केले. मेळाव्यास विविध संस्थांचे पदाधिकारी, संचालक, ठरावधारक, दूध उत्पादक व कार्यकर्ते उपस्थित होते.

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here