कोल्हापूर : एकल माता आणि त्यांच्या पाल्यांना शैक्षणिक व आरोग्यविषयक आधार देण्यासाठी चंद्रकांतदादा पाटील यांच्या संकल्पनेतून ‘एकल माता, एकल विद्यार्थी’ उपक्रम राबविण्यात येत आहे. महाराष्ट्र हौसिंग सोसायटी येथे महिला संमेलन घेऊन एकल मातांना गणेशोत्सवानिमित्त भेटवस्तू देण्यात आल्या.
या उपक्रमांतर्गत आतापर्यंत १४५ एकल मातांची नोंद झाली असून, सर्वेक्षण व फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी १० हजार रुपयांपर्यंत आर्थिक मदत, तसेच आवश्यक औषधांवर ५० टक्के सवलत देण्यात येणार आहे. दर दोन महिन्यांनी कुटुंबांशी संपर्क साधून त्यांच्या गरजेनुसार मदत करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले.






