डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलला रोटरीकडून ६३ लाखांचे अत्याधुनिक वैद्यकीय साहित्य…

0
25
Google search engine

कोल्हापूर : रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सनराईजतर्फे कदमवाडी येथील डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूटला ‘प्रोजेक्ट नेफ्रोकेअर’ अंतर्गत सुमारे ६३ लाख रुपये किमतीची अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे प्रदान करण्यात आली.

रोटरी इंटरनॅशनलचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रोटेरियन डॉ. लेनी डिकोस्टा यांच्या हस्ते आणि डी. वाय. पाटील ग्रुपचे विश्वस्त पृथ्वीराज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत उपकरणे हस्तांतरित करण्यात आली. यामध्ये सीआरआरटी मशीन, मल्टीपॅरा मॉनिटर, सिरिंज पंप, इन्फ्युजन पंप आणि डायलिसिस बेड यांचा समावेश आहे.

या उपकरणांमुळे गंभीर मूत्रपिंड विकार असलेल्या रुग्णांना उपचार देताना मोठी मदत होणार असून, नेफ्रोलॉजी विभागातील रुग्णसेवा अधिक सक्षम होणार आहे. ग्रामीण भागातील गरजू रुग्णांना अत्याधुनिक उपचार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे मान्यवरांनी सांगितले.

यावेळी डॉ. सुषमा जोतकर, डॉ. आर. के. शर्मा, डॉ. व्ही. व्ही. भोसले, डॉ. आर. जे. ख्यालप्पा, डॉ. पद्मजा देसाई, डॉ. वैशाली गायकवाड यांच्यासह रोटरी क्लबचे पदाधिकारी उपस्थित होते.

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here