कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
पाऊस सुरु होऊन दोन महिने होत आहेत. यावर्षी पाऊस दरवर्षी पेक्षा एक महिना आधीच सुरु झाला आहे. पावसामुळे नवनिर्मितीस चालना मिळते. विशेषत: वनस्पतीसाठी पावसाळा पोषक असतो. वनस्पती वाढीबरोबरच या वनस्पतीवर जगणारे कीटकांचीही निर्मिती होत असते. यावर्षी सलग दोन महिने पडत असलेल्या पावसामुळे आणि तापमानातील बदलामुळे विशेषत: भाजीपाला पिकांवर (टोमॅटो, भेंडी, वांगे, कांदा) कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. याचबरोबर ऊस पिकावर खोड कीड, कांडी कीड, शेंडे कीड, मूळ पोखरणारी अळी, खवले कीड यांसारख्या किडींचा प्रादुर्भाव होत आहे. टोमॅटो पिकावर विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे.
कीड नियत्रणासाठी शेतकऱ्यांनी किडी आणि रोगांचा प्रादुर्भाव ओळखणे आवश्यक आहे आणि त्यानुसार उपाययोजना करणे करावेत. टोमॅटो पिकावर विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असून त्यावर पूर्वनियंत्रणाचे उपाय करणे आवश्यक आहे. पिकावर कीडनाशकांची फवारणी करताना, बुरशीनाशक बदलून फवारणी करणे फायद्याचे ठरते.
तंत्रज्ञानाचा वापर: कीड कमी करण्यासाठी कामगंध सापळे, प्रकाश सापळे आणि गुळाच्या खड्यांचा वापर करून किडींचे नियंत्रण करावी. सेद्रिय कीटकनाशके जसे की मेटाऱ्हेजीम, बिव्हेरिया किंवा व्हर्टिसिलियम यांचा वापर करणे फायद्याचे ठरते.
शेतकरी बांधवांनी पिकांवरील कीड आणि रोग नियंत्रणाचे उपाय नियमित करावेत. तसेच कृषी विभागाच्या योजना आणि तांत्रिक माहितीचा लाभ घ्यावा, असे कृषी विभागाने आवाहन केले आहे.
—————————————————————————-






