गोकुळच्या उत्पादन गुणवत्तेबाबत संभ्रम नको : सुद्रिक

0
89
Google search engine

 

कोल्हापूर : गोकुळचे दूध व दुग्धजन्य पदार्थ हे सर्व भारतीय अन्नसुरक्षा आणि गुणवत्ता मानकांनुसार उच्च दर्जाचे असून त्यांच्या गुणवत्तेचा हलाल प्रमाणपत्राशी कोणताही संबंध नसल्याचे प्राधिकृत अधिकारी मंडळाचे अध्यक्ष संजयकुमार सुद्रिक यांनी स्पष्ट केले. 

सोशल मीडियावर पसरवल्या जाणाऱ्या चुकीच्या व अपुऱ्या माहितीद्वारे ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण केला जात असल्याचे सांगत त्यांनी अशा अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले.गोकुळने FSSAI, ISO 22000, EIC आणि HACCP यांसारख्या मानकांचे पालन करून दर्जेदार उत्पादने उपलब्ध करून दिली आहेत. गोकुळच्या प्रतिमेला धक्का पोहोचवणारी दिशाभूल करणारी माहिती प्रसारित करणाऱ्यांवर आवश्यकतेनुसार कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही सुद्रिक यांनी दिला.

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here