फळ्यावरची अक्षरे पुसली जातात; शिक्षकांनी दिलेले संस्कार कायम स्मरणात राहतात : आमदार सतेज पाटील

0
59
Google search engine

कोल्हापूर : करवीर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेची ४२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार, दि. २० सप्टेंबर २०२६ रोजी शाहू स्मारक भवन, कोल्हापूर येथे आमदार जयंत आसगावकर यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी संस्थेच्या वतीने सर्व सेवानिवृत्त सभासदांचा सत्कार तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.

शिक्षक विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण करून त्यांना आयुष्याची योग्य दिशा देतात. त्यांच्या शिकवणीतून मिळणारी शिस्त, विचार आणि माणुसकीचे संस्कार विद्यार्थ्यांच्या आयुष्यभर सोबत राहतात. त्यामुळे “फळ्यावर लिहिलेली अक्षरे पुसली जातात; मात्र शिक्षकांनी केलेले संस्कार कायमचे स्मरणात राहतात,” अशा भावना आमदार सतेज पाटील यांनी यावेळी व्यक्त केल्या.

शिक्षक हा केवळ विद्यार्थ्यांना विषयाचे ज्ञान देणारा नसून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला आकार देणारा मार्गदर्शक असतो. विद्यार्थ्यांच्या यशामागे शिक्षकांचे मार्गदर्शन, मेहनत आणि संस्कार यांचा मोठा वाटा असतो. त्यामुळे शिक्षकांच्या कार्याचा सन्मान करणे आणि त्यांच्या योगदानाची दखल घेणे ही समाजाची जबाबदारी असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.

यावेळी पंचायत समिती सभापती साताप्पा पाटील, जिल्हा परिषद गटनेते एकनाथ पाटील, माजी सभापती बी. एच. पाटील, पंचायत समिती सदस्य विलास भोसले, निवास पाटील, मेघा नाळे, तानाजी किल्लेदार, उदय सरनाईक, सुरेश कोळी, वर्षा केनवडे, कृष्णात कारंडे, प्रा. मधुकर पाटील, पद्मजा मेढे, चेअरमन धनाजी सासणे, सचिन पावसकर, शरद केनवडे, गजानन मोरे, बाबासाहेब धुमाळ, धनाजी पाटील यांच्यासह संस्थेचे सर्व संचालक, पदाधिकारी आणि सभासद उपस्थित होते.

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here