डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकला बेस्ट पॉलिटेक्निक पुरस्कार

0
28
Google search engine

कसबा बावडा येथील डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकला महाराष्ट्रातील ” बेस्ट पॉलिटेक्निक” पुरस्कार प्राप्त झाला आहे. इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशन, नवी दिल्ली यांच्या महाराष्ट्र – गोवा विभागातर्फे हा पुरस्कार जाहीर झाला आहे. दोन नोव्हेंबर रोजी गोवा येथे पुरस्कार वितरण होणार आहे, अशी माहिती प्राचार्य डॉ.महादेव नरके यांनी दिली.

डॉ. डी. वाय. पाटील पॉलीटेक्निकच्या माध्यमातून विद्यार्थी केंद्रीत उपक्रम सातत्याने राबविले जातात. शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये पॉलीटेक्निकला महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, मुंबई यांच्याकडून (एम. एस. बी. टी. ई.) एक्सलंट श्रेणी प्राप्त झाली आहे.

पॉलीटेक्निकमधील पायाभूत सुविधा, शैक्षणिक कामकाज, विद्यार्थ्यांचे परीक्षांमधील निकाल, क्रीडा स्पर्धेतील यश, सांस्कृतिक व सामाजिक उपक्रम, उद्योग क्षेत्राबरोबर केलेले सामंजस्य करार, शिक्षकांसाठी राबविलेले प्रोत्साहनपर व संशोधनात्मक कार्यक्रम, विद्यार्थ्यांना मिळालेले पेटंट, विद्यार्थ्यांनी सुरु केलेले स्टार्टअप, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत माजी विद्यार्थ्यांशी सुसंवाद तसेच ‘हिरकणी मंच’च्या माध्यमातून विद्यार्थिनींसाठी राबविलेले वैविध्यपूर्ण उपक्रम आणि विद्यार्थ्यांना नोकरी मिळवून देण्यासाठी केलेले प्रयत्न याची दखल घेवून पॉलीटेक्निकला हा पुरस्कार मिळाला आहे.

या बद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आ. सतेज पाटील, विश्वस्त माजी आमदार ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, सीएचआरओ श्रीलेखा साटम यांनी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी अभिनंदन केले.

यासाठी प्राचार्य डॉ. महादेव नरके, उपप्राचार्य नितीन माळी, रजिस्ट्रार महेश रेणके, विभाग प्रमुख डॉ. पी.के. शिंदे, प्रा. एस.बी. शिंदे, प्रा. अक्षय करपे, प्रा. शीतल साळोखे, प्रा. सचिन पाटील तसेच सर्व स्टाफ यांनी परिश्रम घेतले.

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here