पुणे : पुणे जिल्हा शिक्षक लोकशाही आघाडी, पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ, माध्यमिक शिक्षिका संघ, सेवानिवृत्त माध्यमिक शिक्षक संघ व उच्च माध्यमिक शिक्षक संघाच्या कार्यकारिणीच्या वतीने आयोजित गुणवंत शिक्षक पुरस्कार वितरण विवेकानंद शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे यांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला. शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या शिक्षकांचा यावेळी गौरव करण्यात आला.
शिक्षकांचा सन्मान हा केवळ व्यक्तीचा गौरव नसून, समाज घडविणाऱ्या त्यांच्या योगदानाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा प्रसंग असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. पुरस्कारप्राप्त शिक्षकांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी सार्वजनिक आरोग्य, कुटुंबकल्याण, सार्वजनिक बांधकाम, महिला व बालकल्याण राज्यमंत्री मेघनादिदी दीपकजी साकोरे-बोर्डीकर, श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष अभयकुमार साळुंखे, किरण संपत साकोरे, जी. के. थोरात, के. एस. ढोमसे, डॉ. श्रीराम साळुंखे यांच्यासह टी.डी.एफ. व विविध शिक्षक संघटनांचे पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते.






