महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी सुरक्षा उपाययोजना करा; गोकुळ कर्मचारी संघटनेची मागणी

0
51
Google search engine

कोल्हापूर : पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील उजळाईवाडी ते कागलदरम्यान सुरू असलेल्या रुंदीकरणाच्या कामामुळे अपघातांचे प्रमाण वाढत असल्याने तातडीने सुरक्षा उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आयटक संलग्न गोकुळ कर्मचारी संघटनेने केली आहे.

गोकुळ शिरगाव आणि कागल फाईव्ह स्टार एमआयडीसीमध्ये काम करणाऱ्या कामगारांची या मार्गावरून मोठ्या प्रमाणात ये-जा असते. २२ सप्टेंबर रोजी गोकुळ दूध संघाचे कर्मचारी रामचंद्र सदाशिव पाटील यांचा अपघाती मृत्यू झाल्याचा उल्लेख करत, भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी संघटनेने केली.

याबाबत २४ सप्टेंबर रोजी NHAIचे प्रकल्प संचालक जी. पी. बैरवा यांना निवेदन देण्यात आले. उपाययोजना न झाल्यास महामार्ग रोको आंदोलन करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here