NEP 2020 मधील कार्यभार व CHB प्राध्यापकांच्या प्रश्नांवर तातडीने निर्णय घ्या; कौस्तुभ गावडेंची मागणी

0
31
Google search engine

कोल्हापूर : नवीन शैक्षणिक धोरण (NEP 2020) मुळे महाविद्यालयीन स्तरावरील विषयांची रचना आणि अध्यापन पद्धतीत बदल झाल्याने प्राध्यापकांच्या कार्यभारावर परिणाम झाला आहे. नवीन विषयांचा कार्यभार अनुदानित कार्यभार म्हणून ग्राह्य धरावा, तसेच CHB (Clock Hour Basis) प्राध्यापकांच्या प्रलंबित प्रश्नांवर तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी शिक्षक मित्र कौस्तुभ गावडे यांनी शिक्षण विभागाकडे केली आहे.

याबाबत शिक्षण सहसंचालक, कोल्हापूर आणि शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरूंकडे स्वतंत्र निवेदने देण्यात आली. OE, SEC, IKS, VEC आणि VSC यांसारख्या नवीन विषयांचा कार्यभार अनुदानित कार्यभार म्हणून मान्य करावा, तसेच CC, VEC, CEP, FP आणि OJT यांच्या कार्यभाराबाबत स्पष्ट धोरण करावे, अशी मागणी करण्यात आली.

नवीन अभ्यासक्रमामुळे काही विषयांचा कार्यभार कमी झाल्याने संबंधित प्राध्यापकांवर अन्याय होऊ नये, यासाठी NEPनुसार बदललेला संपूर्ण कार्यभार अनुदानित म्हणून ग्राह्य धरावा, अशी भूमिका कौस्तुभ गावडे यांनी मांडली.
याशिवाय शिवाजी विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमध्ये अनेक वर्षांपासून कार्यरत असलेल्या CHB प्राध्यापकांना न्याय देण्याची मागणी करण्यात आली. रिक्त पदांवर १०० टक्के नियमित भरती, शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीपासून CHB नियुक्ती, Ad-hoc Full Time नियुक्तीची व्यवस्था, CHB सेवेचा अनुभव नियमित भरतीसाठी ग्राह्य धरणे, अध्यापन अनुभवाला गुणांकन आणि पारदर्शक मुलाखत प्रक्रिया राबवावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली.

यावेळी प्राचार्य डॉ. शंकर खाडे, सांगली सहविभागप्रमुख प्राचार्य डॉ. सुरेश पाटील, प्राचार्य डॉ. एल. जी. जाधव, प्राचार्य डॉ. अनिल पाटील, प्राचार्य डॉ. सतीश देसाई, प्रकाश हाके आणि हितेंद्र साळुंखे उपस्थित होते.
NEPमुळे निर्माण झालेला कार्यभार आणि CHB प्राध्यापकांचे प्रश्न हे शैक्षणिक गुणवत्तेशी निगडित असल्याने शासन, शिक्षण विभाग व विद्यापीठ प्रशासनाने तातडीने सकारात्मक धोरणात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेने केली आहे.

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here