पुढचा जन्मही याच मातेच्या पोटी व्हावा’; धनंजय महाडिक यांनी व्यक्त केले मातृऋण

0
46
Google search engine

कोल्हापूर : खासदार धनंजय महाडिक यांच्या मातोश्री श्रीमती शकुंतला महाडिक आणि मंगलताई महाडिक यांचा ७५ वा अमृतमहोत्सवी वाढदिवस महाडिक परिवाराच्या वतीने उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून मातोश्रींचे आशीर्वाद घेतले.

खासदार श्रीमंत शाहू महाराज यांच्या हस्ते शकुंतला महाडिक आणि मंगलताई महाडिक यांना मानपत्र देऊन मातृशक्तीला वंदन करण्यात आले. पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, आमदार विनय कोरे, आमदार अमल महाडिक, राजेश क्षीरसागर, चंद्रदीप नरके, अशोकराव माने, राजेंद्र पाटील-यड्रावकर, माजी आमदार महादेवराव महाडिक, महापौर रूपाराणी निकम, संजयबाबा घाटगे, सुरेश हाळवणकर, प्रकाश आवाडे, माजी खासदार संजय मंडलिक यांच्यासह राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

यावेळी “मातृऋण कधीही फिटत नाही. त्यांच्या मायेच्या सावलीत आमची जीवनाची वाटचाल सुरू आहे. पुढचा जन्मही याच मातेच्या पोटी व्हावा,” अशा भावनिक शब्दांत धनंजय महाडिक यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यांच्या या वक्तव्याने उपस्थित वातावरण भावूक झाले.

महाडिक कुटुंबीयांनी आईच्या जीवनप्रवासातील आठवणींना उजाळा देत त्यांना शुभेच्छा दिल्या. अरुंधती महाडिक, वैष्णवी महाडिक, मंजिरी महाडिक, संग्रामसिंह कुपेकर, रामराजे कुपेकर, पृथ्वीराज महाडिक, विश्वराज महाडिक, कृष्णराज महाडिक यांच्यासह परिवारातील सदस्य उपस्थित होते. प्रेम, आपुलकी आणि आशीर्वादांनी भारलेला हा अमृतमहोत्सवी सोहळा महाडिक परिवारासाठी अविस्मरणीय ठरला.

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here