Google search engine

प्रसारमाध्यम l दिग्विजय माळकर

न्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर राज्य मार्ग परिवहन (एसटी) महामंडळाने प्रवाशांना झटका दिला आहे. १५ एप्रिलपासून एसटीच्या तिकीट दरात १० टक्के हंगामी वाढ लागू करण्यात येणार आहे. त्यामुळे गावाकडे जाणाऱ्या प्रवाशांच्या खिशाला अतिरिक्त भार सहन करावा लागणार आहे.

परीक्षा संपल्यानंतर मोठ्या प्रमाणावर नागरिक गावाकडे रवाना होतात. खेड्यापाड्यांपर्यंत पोहोचणारी एसटी सेवा ही सर्वसामान्यांसाठी सोयीस्कर आणि किफायतशीर मानली जाते. मात्र, या हंगामी भाडेवाढीमुळे लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी प्रवाशांना सुमारे ९० ते १०० रुपये अधिक मोजावे लागतील.   

महामंडळाला गर्दीच्या हंगामात तात्पुरती भाडेवाढ करण्याची परवानगी आहे. त्यानुसार ही वाढ लागू करण्यात आली आहे. मागील वर्षी दिवाळीत जाहीर करण्यात आलेली अशीच वाढ नागरिकांच्या विरोधामुळे मागे घेण्यात आली होती. यंदाही या निर्णयावर प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे.

ही भाडेवाढ साधी, मिडी, जलद (एक्सप्रेस) आणि रात्रसेवा या बसप्रकारांसाठी लागू असेल. नव्या दरानुसार किमान भाडे प्रौढांसाठी १२ रुपये, तर लहान मुलांसाठी ७ रुपये करण्यात आले आहे.
अशी होणार भाडे वाढ….

प्रति टप्पा भाडे

बस प्रकार सध्याचे भाडे उन्हाळी भाडे
साधी (मिडी/साधी) 10.05 रुपये 11.05 रुपये
जलद (एक्सप्रेस) 10.50 रुपये 11.05 रुपये

प्रमुख मार्गांवरील भाडेवाढ

मार्ग सध्याचे भाडे उन्हाळी भाडे
परळ – कोल्हापूर (साधी) 640 रु. 704 रु.
मुंबई – छत्रपती संभाजीनगर 800 रु. 900 रु.
मुंबई – सोलापूर (साधी) 750 रु. 825 रु.
मुंबई – जालना (साधी) 800 रु. 900 रु.
मुंबई – लातूर (साधी) 900 रु. 1000 रु.
मुंबई – सांगली (साधी) 730 रु. 803 रु.
मुंबई – रत्नागिरी (साधी) 600 रु. 700 रु.
Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here