खासगी विद्यापीठांच्या निकषांचा आढावा; डॉ. भूषण पटवर्धन समितीला ऑक्टोबरअखेरपर्यंत मुदतवाढ…

0
40
Google search engine

मुंबई : राज्यातील खासगी विद्यापीठांशी संबंधित निकषांचा अभ्यास करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या डॉ. भूषण पटवर्धन समितीची आढावा बैठक आज मंत्रालयात अध्यक्षतेखाली पार पडली.या बैठकीत राज्यातील खासगी विद्यापीठांचे निकष, उच्च शिक्षणाचा दर्जा, भविष्यातील शैक्षणिक गरजा तसेच विद्यापीठांची कार्यपद्धती याबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला. समितीने केलेल्या सर्वंकष अभ्यासाच्या आधारे योग्य शिफारसी सादर करण्यासाठी समितीला ऑक्टोबर २०२६ अखेरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

निर्धारित कालावधीत अभ्यास पूर्ण करून अंतिम अहवाल सादर करण्याच्या स्पष्ट सूचना प्रशासनाला देण्यात आल्या. खासगी विद्यापीठांच्या निकषांबाबत भविष्यातील गरजा लक्षात घेऊन समितीच्या शिफारसी महत्त्वपूर्ण ठरणार आहेत.

या बैठकीस उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, राज्य सामाईक परीक्षा कक्षाचे आयुक्त दिलीप सरदेसाई, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, तंत्रशिक्षण संचालक डॉ. प्रमोद नाईक, उपसचिव अशोक मांडे, अमोल मुत्याल, प्रताप लुबाळ, सहसंचालक डॉ. अर्चना बोऱ्हाडे, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजनीश कामत, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रविंद्र कुलकर्णी, प्र-कुलगुरू डॉ. अजय भामरे तसेच समितीचे सदस्य ऑनलाइन उपस्थित होते.

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here