कोल्हापुरात शिक्षकमित्र कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराचा शुभारंभ; शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

0
75
Google search engine

कोल्हापूर : पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार शिक्षकमित्र कौस्तुभ मुरलीधर गावडे यांच्या प्रचाराचा शुभारंभ कोल्हापुरात उत्साहात करण्यात आला. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे संस्थापक शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या समाधीस्थळी हा कार्यक्रम पार पडला.संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांच्या हस्ते प्रचाराचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी शिक्षक संघटनांचे पदाधिकारी, गुरुदेव कार्यकर्ते, प्रशासकीय व कार्यालयीन कर्मचारी तसेच महिला शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी शिक्षकांच्या विविध प्रश्नांवर सातत्याने काम करण्यासह त्यांच्या अडचणी समजून घेणे, त्यांची भूमिका प्रभावीपणे मांडणे आणि हक्कांसाठी पाठपुरावा करण्याची भूमिका मांडण्यात आली. शिक्षक मतदारांच्या नोंदणीचे नियोजन तसेच पुणे विभागातील पाचही जिल्ह्यांतील शिक्षकांशी असलेल्या संपर्काचा उल्लेखही यावेळी करण्यात आला.

प्रचाराच्या शुभारंभप्रसंगी प्राचार्य डॉ. अशोकराव जगताप, विभागप्रमुख डॉ. श्रीराम साळुंखे, प्राचार्या डॉ. श्रृती जोशी, प्राचार्य डॉ. सी. बी. पाटील, डॉ. कविता तिवडे, डॉ. आर. वाय. पाटील, हितेंद्र साळुंखे, महेश साळुंखे यांच्यासह विविध शिक्षक संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

शिक्षकांच्या प्रश्नांवर सातत्याने संवाद साधत त्यांची भूमिका पुढे नेण्याचा मुद्दा प्रचारात केंद्रस्थानी राहणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here