कोल्हापुरात २ ऑक्टोबरपासून ‘मॅपकॉन २०२६’; देशभरातील ६०० हून अधिक तज्ज्ञ डॉक्टरांची उपस्थिती..

0
85
Google search engine

कोल्हापूर : इंडियन असोसिएशन ऑफ पॅथॉलॉजिस्ट अँड मायक्रोबायोलॉजिस्ट, महाराष्ट्र चॅप्टरचे ४७ वे वार्षिक अधिवेशन ‘मॅपकॉन २०२६’ यंदा कोल्हापुरात होत आहे. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजच्या पॅथॉलॉजी विभागातर्फे २ ते ४ ऑक्टोबरदरम्यान हॉटेल सयाजी येथे या तीन दिवसीय अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये महाराष्ट्रासह देशभरातील ६०० हून अधिक तज्ज्ञ डॉक्टर, संशोधक आणि पदव्युत्तर विद्यार्थी सहभागी होणार आहेत.

‘नेक्स्ट जनरेशन पॅथॉलॉजी’ ही यंदाच्या अधिवेशनाची थीम असून मॉलिक्युलर डायग्नोस्टिक्स, डिजिटल पॅथॉलॉजी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आणि प्रिसिजन मेडिसिन यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानावर तज्ज्ञांकडून विचारमंथन केले जाणार आहे. मार्गदर्शक व्याख्याने, विशेष सत्रे, शोधनिबंध व पोस्टर सादरीकरण तसेच पुरस्कारांचे आयोजन करण्यात आले आहे.अधिवेशनाचे उद्घाटन २ ऑक्टोबर रोजी डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी डी. वाय. पाटील ग्रुपचे विश्वस्त ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

दरम्यान, मॅपकॉनच्या इतिहासात प्रथमच ‘ग्रीन कॉन्फरन्स’ आयोजित करण्यात येत आहे. डिजिटल ॲब्स्ट्रॅक्ट बुक, ई-प्रमाणपत्रे, क्यूआर कोडद्वारे नोंदणी, प्लास्टिक बाटल्या व फ्लेक्सचा वापर टाळणे, सीड-पेपर व ज्यूट बॅगचा वापर तसेच प्रत्येक नोंदणीमागे वृक्षलागवड अशा पर्यावरणपूरक उपक्रमांचा यामध्ये समावेश आहे.
परिषदेची माहिती पॅथॉलॉजी विभागप्रमुख व संयोजन समितीच्या अध्यक्षा डॉ. सुचिता देशमुख, सचिव डॉ. आर. एस. पाटील आणि खजिनदार डॉ. आर. एम. शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here