Google search engine

प्रसारमाध्यम l दिग्विजय माळकर 

बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डा आणि त्याची पत्नी लिन लैश्राम सध्या पालकत्वाचा आनंद लुटत आहेत. १० मार्च २०२६ रोजी त्यांच्या घरी कन्यारत्नाचा जन्म झाला होता. आता लिनने सोशल मीडियावर आपल्या एक महिन्याच्या लेकीची, ‘न्योमिका’ची पहिली झलक शेअर केली आहे.

रणदीप हुड्डा और लिन लैशराम, फोटो- इंस्टाग्राम

लिनने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोंमध्ये आई-मुलीचे खास नाते पाहायला मिळते. पहिल्या फोटोमध्ये ती न्योमिकाला कुशीत घेऊन सेल्फी घेताना दिसते. जरी या फोटोंमध्ये चिमुकलीचा चेहरा पूर्णपणे स्पष्ट दिसत नसला, तरी तिच्या क्यूटनेसने चाहत्यांची मने जिंकली आहेत.

रणदीप हुड्डा और लिन लैशराम, फोटो- इंस्टाग्राम

सध्या असं आयुष्य सुरू आहे,” असे कॅप्शन देत लिनने आपल्या मातृत्वाचा आनंद व्यक्त केला आहे. या पोस्टवर चाहत्यांकडून आणि सेलिब्रिटींकडूनही भरभरून प्रतिक्रिया येत आहेत.

न्योमिका एक महिन्याची झाल्यानंतर या जोडप्याने तिचे नाव जाहीर केले होते. “आमच्या जगाचे नवीन केंद्र  न्योमिका. जिचा अर्थ दैवी कृपा, स्वातंत्र्य आणि आकाशासारखी अमर्याद,” असे भावनिक कॅप्शन त्यांनी दिले होते.

https://www.instagram.com/p/DW8E9nsEn7X/?utm_source=ig_embed&ig_rid=e25ea806-0e87-45eb-b382-20c0aaa19a02

दरम्यान, या गोंडस झलकांमुळे ‘न्योमिका’ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली असून नेटकऱ्यांची मने जिंकताना दिसत आहे.

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here