बालकांमधील एंडोक्राइन विकारांवर डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये परिषद…

0
17
Google search engine

कोल्हापूर : बालकांमध्ये वाढत असलेला लठ्ठपणा, मधुमेह, वाढीशी संबंधित समस्या, हाडांचे आजार तसेच विविध अंतःस्रावी विकारांचे आधुनिक निदान व उपचारपद्धती यावर मार्गदर्शन करणारी वैद्यकीय परिषद व कार्यशाळा डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये उत्साहात संपन्न झाली.डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या बालरोग विभागातर्फे कोल्हापूर बालरोगतज्ज्ञ संघटना आणि अखिल भारतीय एंडोक्राइन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

बाल व पौगंडावस्थेतील मुलांमध्ये आढळणाऱ्या विविध अंतःस्रावी ग्रंथींचे विकार, त्यांचे अचूक निदान, उपचार आणि आधुनिक वैद्यकीय व्यवस्थापन यावर तज्ज्ञांनी सखोल मार्गदर्शन केले.
आंतरराष्ट्रीय स्तरावरील तज्ज्ञ डॉ. वामन खाडिलकर, डॉ. अनुराधा खाडिलकर आणि डॉ. गणेश जवळेकर यांनी बालक व पौगंडावस्थेतील मुलांमधील विविध एंडोक्राइन विकारांबाबत मार्गदर्शन केले.

वाढत्या लठ्ठपणामुळे उद्भवणाऱ्या आरोग्यविषयक समस्या, बालमधुमेह, मुलांची उंची व वाढीशी संबंधित विकार तसेच हाडांशी संबंधित आजार याबाबत तज्ज्ञांनी सविस्तर माहिती दिली. आजारांचे प्रतिबंधात्मक उपाय, आधुनिक उपचारपद्धती आणि वैद्यकीय व्यवस्थापनातील नव्या दृष्टिकोनांवरही यावेळी चर्चा झाली.

कार्यशाळेचे उद्घाटन डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेश ख्यालप्पा यांच्या हस्ते झाले. कोल्हापूर, सांगली आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील सुमारे ८० बालरोगतज्ज्ञांनी परिषदेत सहभाग नोंदविला.

यावेळी कोल्हापूर बालरोगतज्ज्ञ संघटनेचे पदाधिकारी डॉ. विजय गावडे, डॉ. मिलिंद सदावर्ते आणि डॉ. रुचिका यादव तसेच एंडोक्राइन विषयातील तज्ज्ञ डॉ. अनिकेत कुंभोजकर आणि डॉ. इशिता भौमिक यांची विशेष उपस्थिती होती.

संयोजन समितीच्या प्रमुख तथा डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या बालरोग विभागप्रमुख डॉ. निवेदिता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या परिषदेचे आयोजन करण्यात आले. उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विभागातील डॉ. मोहन पाटील, डॉ. सुहास कुलकर्णी, डॉ. निगडे आणि डॉ. श्रद्धा कुलकर्णी यांचे सहकार्य लाभले.

या उपक्रमास डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा, अधिष्ठाता डॉ. राजेश ख्यालप्पा आणि वैद्यकीय अधीक्षक डॉ. वैशाली गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभले.

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here