Google search engine

प्रसारमाध्यम l दिग्विजय माळकर

मे 2025 मध्ये पार पडलेल्या ऑपरेशन सिंदूरमध्ये प्रभावी कामगिरी बजावलेल्या भारतीय सैन्याच्या 155 मिमी शारंग आर्टिलरी तोफेचं सुधारित आणि अधिक घातक व्हर्जन आता पूर्णपणे युद्धासाठी सज्ज करण्यात आलं आहे. ही तोफ 506 आर्मी बेस वर्कशॉपच्या तज्ज्ञ टीमने पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानाच्या आधारे नव्याने ओव्हरहॉल व अपग्रेड केली आहे.

 पूर्ण ओव्हरहॉल, वाढली ताकद आणि आयुष्य

शारंग तोफेची सखोल तांत्रिक तपासणी करून तिच्या प्रमुख घटकांचं नवनीकरण आणि दुरुस्ती करण्यात आली आहे.
यामध्ये 

  • गन बॅरल (तोफेची नळी)

  • रिकॉइल मॅकेनिझम (झटका नियंत्रक यंत्रणा)

  • फायर कंट्रोल सिस्टीमशी संबंधित भाग

यांचा समावेश आहे. या प्रक्रियेमुळे तोफेचं कार्यक्षम आयुष्य वाढलं असून दीर्घकाळ अचूक आणि विश्वासार्ह मारा करण्याची क्षमता कायम राहणार आहे.

 सुधारित क्षमतांचा आढावा

अपग्रेड केलेल्या शारंग तोफेच्या प्रमुख क्षमता पुढीलप्रमाणे –

  • 35 किलोमीटरपेक्षा अधिक रेंज

  • वेगवान आणि अत्यंत अचूक हल्ल्याची क्षमता

  • हाय-एक्सप्लोसिव आणि विशेष प्रकारचे तोफगोळे डागण्याची क्षमता

  • शत्रूच्या हद्दीत खोलवर घातक परिणाम

  • मैदानी तसेच उंच पर्वतीय युद्ध क्षेत्रात प्रभावी कामगिरी

या कारणांमुळे शारंग तोफ भारतीय सैन्याच्या आर्टिलरी युनिटसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते.

ऑपरेशन सिंदूरचा अनुभव ठरला उपयुक्त

ऑपरेशन सिंदूरदरम्यान शारंग तोफेने दूरवरून अचूक लक्ष्यभेद करण्याची क्षमता यशस्वीरीत्या सिद्ध केली होती. या मोहिमेतून मिळालेल्या प्रत्यक्ष युद्धअनुभवाचा उपयोग आता तोफेच्या देखभाल आणि तांत्रिक सुधारणा करण्यासाठी करण्यात आला आहे. परिणामी, ही तोफ आता अधिक सक्षम आणि घातक बनली आहे.

 जवानांचं कौशल्य, देशांतर्गत उत्पादन

506 आर्मी बेस वर्कशॉपमधील जवान आणि अधिकाऱ्यांच्या उच्च दर्जाच्या तांत्रिक कौशल्याचं आणि मेहनतीचं हे उत्तम उदाहरण आहे. विशेष म्हणजे हे संपूर्ण काम कुठल्याही परदेशी कंपनीच्या मदतीशिवाय, भारतातच पूर्ण करण्यात आलं आहे.

आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठं पाऊल

या उपक्रमामुळे

  • भारतीय सैन्याची युद्धतयारी अधिक मजबूत झाली आहे

  • शस्त्रसज्जतेसाठी परदेशी कंपन्यांवरील अवलंबित्व कमी झालं आहे

  • संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरतेला मोठी चालना मिळाली आहे

सैन्याच्या सूत्रांनी सांगितलं की, या तोफेमुळे सैन्याची तयारी अधिक मजबूत झालीय. तोफेचं आयुष्य वाढलं आहे. परदेशी कंपन्यांवर अवलंबित्व कमी झालय.असे स्वदेशी अपग्रेड आणि तांत्रिक प्रयत्न पुढेही सुरू राहणार असून त्यामुळे भारतीय आर्टिलरी सदैव सज्ज आणि बलशाली राहील.

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here