प्रसारमाध्यम l दिग्विजय माळकर
गडहिंग्लज : गडहिंग्लज तालुक्यातील हलकर्णी गावात श्रद्धा, परंपरा आणि भक्तीचा संगम अनुभवायला मिळत आहे. येथे महालक्ष्मी देवी आणि दुर्गा मातेची पाच दिवसांची यात्रा मोठ्या उत्साहात पार पडत आहे.
तब्बल तीनशे वर्षांनंतर, २०१७ साली यात्रा झाली होती. आणि आता तब्बल ९ वर्षांनी यावर्षी म्हणजेच २०२६ यात्रा संपन्न होत आहे. देवी ची यात्रा ही परंपरेने कौल लावून देवीची परवानगी असेल तरच भक्तिभावाने साजरी केली जाते. हे या यात्रेच वैशिष्ट असून देवीची मूर्ती हि स्वयंभू आहे, असे म्हंटले जाते.
यावर्षी २०२६ मध्येही या यात्रेला मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी होत असून,बाहेर गावी नोकरी व्यवसायासाठी गेलेले गावकरी सुद्धा यात्रेच्या निमित्ताने गावी देवीच्या दर्शनासाठी येत आहेत. देवीला खांद्यावर घेऊन ढोल-ताशांचा गजरात,तिची मिरवणूक काढतात. तिला असे खांद्यावर घेऊन खेळवण्याची परंपरा आहे. खूप भक्तिमय वातावरण हलकर्णी या गावी झाले आहे.
या यात्रेदरम्यान गावातील नागरिक देवीकडे आपल्या कुटुंबाच्या चांगले आरोग्य व भरभराटीसाठी प्रार्थना करतात.
हलकर्णी गावातील ही यात्रा केवळ धार्मिक सोहळा नसून, गावाच्या एकतेचे आणि श्रद्धेचे प्रतीक ठरत आहे






