कोल्हापूर : पाश्चात्त्य संस्कृतीचा वाढता प्रभाव पाहता हिंदू संस्कृती आणि धार्मिक परंपरा जपणे आवश्यक आहे. येणाऱ्या पिढीवर सुसंस्कार करण्यासाठी हिंदू धर्म शिक्षण वर्गांचे आयोजन करण्यात येईल, असे राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी सांगितले.
समस्त हिंदुत्ववादी संघटना व आमदार राजेश क्षीरसागर फाउंडेशनतर्फे नष्टे लॉन येथे श्रावण व्रत वैकल्य सामुदायिक उपवास सोडण्याचा कार्यक्रम झाला. यावेळी १०८ जोडप्यांनी सामुदायिकरीत्या उपवास सोडला, तर सुमारे पाच हजार हिंदू बांधवांनी कार्यक्रमाचा लाभ घेतला. कार्यक्रमात जलाभिषेक, गोमाता पूजन, ध्वजवंदन, महायज्ञ व आरतीचे आयोजन करण्यात आले.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, माजी कोषाध्यक्ष वैशाली क्षीरसागर, नगरसेवक ऋतुराज क्षीरसागर, प्रसाद चव्हाण, नगरसेविका मंगल साळोखे, वंदना मोहिते, युवानेते पुष्कराज क्षीरसागर, तसेच यादव महाराज, सुधीर जोशी वंदूरकर, बाबा वाघापुरकर, रोहन अतिग्रे, कमलाकर किलकिले, उदय भोसले, चंद्रकांत बराले, शिवाजी जाधव, किशोर घाटगे, कमलाकर जगदाळे, अर्जुन आंबी, मधुकर नाझरे आदी उपस्थित होते.






