प्रसारमाध्यम l दिग्विजय माळकर
मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावर आडोशी बोगद्याजवळ झालेल्या प्रोपिलीन टँकर अपघाताने तब्बल ३२ तास वाहतूक ठप्प झाली, प्रवासी हैराण झाले, सरकारवर टीका झाली, पण या सर्व गोंधळामागे सुरू होती एक जीवघेणी शर्यत, वेळेशी स्पर्धा, कारण टँकरमध्ये होते २२ टन ज्वलनशील प्रोपिलीन वायू,
अपघातात टँकरचा मेन व्हॉल्व तुटला, उच्च दाबाखालील द्रवरूप प्रोपिलीन वेगाने बाहेर पडू लागला, दाब कमी होताच तापमान –२० ते –२३ अंशांपर्यंत घसरले, गळतीच्या ठिकाणी बर्फासारखा थर साचला, चालकाने हाताने गळती रोखण्याचा प्रयत्न केला, दोन्ही हात गंभीररीत्या भाजले,
प्रोपिलीन वायू वासहीन, अत्यंत ज्वलनशील, ठिणगी लागली असती तर “A spark can start a wildfire”, १० किलोमीटर परिसर धोक्यात आला असता, जवळच पेट्रोल कंपन्यांच्या लाईन्स, घाट परिसराचा अस्तित्वाचा प्रश्न, प्रकरणाचे गांभीर्य ओळखून प्रशासनाने तात्काळ दोन्ही बाजूंनी एक किलोमीटर आधी वाहतूक थांबवली,सावध भूमिका अधिकाऱ्यांनी घेतली. त्यात हजारो प्रवासी अडकले, पण सुरक्षितता महत्वाची होती.
किती मोठा धोका होता?
-
प्रोपिलीन हा अतिशय ज्वलनशील वायू आहे.
-
तो वासहीन असल्यामुळे गळती लगेच लक्षात येत नाही.
-
जर तो एखाद्या ठिणगी, वाहनाच्या इंजिनच्या उष्णतेशी किंवा इंधन लाईनशी संपर्कात आला असता, तर
मोठा स्फोट होऊ शकला असता
आसपासच्या 10 किमी परिसरात गंभीर नुकसान होण्याची शक्यता होती -
जवळच पेट्रोल कंपन्यांच्या पाइपलाईन्स असल्याने धोका अधिक वाढला होता.
गळती रोखण्यासाठी तज्ञांनी धातू नव्हे, पेरूच्या झाडाच्या लाकडाची खुट्टी तयार केली, मऊ, लवचिक, थंडीत फुगणारी, भेगेत घट्ट बसणारी, वाईनच्या बाटलीवरील कॉर्कसारखी सील करणारी, स्पार्क निर्माण न करणारी,३६ तास सुरू असलेल्या ऑपरेशनदरम्यान तीन टप्प्यांत गॅस दुसऱ्या टँकरमध्ये ट्रान्सफर करण्यात आला, आणि अखेर मोठी दुर्घटना टळली.
३२ तासांची कोंडी चर्चेत राहिली, सोशल मीडियावर संताप व्यक्त झाला, पण त्या ३२ तासांत मदतकार्य करणारे अधिकारी, अग्निशमन दल, तांत्रिक पथके जीव धोक्यात घालून काम करत होती, “All’s well that ends well” हे शेवटी खरे ठरले.





