Google search engine

प्रसारमाध्यम l दिग्विजय माळकर 

 राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे  यांच्या मुलगी रेवती सुळे आणि उद्योगपती सारंग लखानी यांचे लग्न लवकरच होणार असून, याच पार्श्वभूमीवर लखानी यांच्या कंपनीने राज्य सरकारसोबत मोठा करार केला आहे. नागपूरमधील उद्योजक सारंग लखानी यांच्या नोव्हॅरियन एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने जलसंपदा विभागामार्फत ₹५,७६० कोटींच्या प्रकल्पासाठी सामंजस्य करार (MoU) केला आहे.

या प्रकल्पांतर्गत रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील रानवाडी येथे उदंचन जलविद्युत प्रकल्प उभारला जाणार आहे. या प्रकल्पाद्वारे सुमारे १२०० मेगावॅट वीज निर्मिती होणार असून, राज्याच्या ऊर्जा क्षमतेत मोठी वाढ अपेक्षित आहे. तसेच, या गुंतवणुकीमुळे सुमारे १,५०० रोजगारनिर्मिती होणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कराराबद्दल विश्वास व्यक्त करताना सांगितले की, उदंचन जलविद्युत प्रकल्पांच्या माध्यमातून महाराष्ट्र देशातील सर्वाधिक ऊर्जा निर्मिती क्षमता असलेले राज्य बनेल. राज्यात अशा प्रकारचे हा ५६वा सामंजस्य करार असून, ऊर्जा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आकर्षित केली जात आहे.

या करारावेळी सारंग लखानी यांचे वडील अरुण लखानी, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि मंत्री गिरीश महाजन उपस्थित होते.

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here