कोल्हापूर महापालिकेला CSR मधून १२ लाखांचे साहित्य; बँक ऑफ बडोदा व ‘बरंच काही फौंडेशन’चा पुढाकार

0
48
Google search engine

कोल्हापूर: कोल्हापूर शहराच्या विकासात सामाजिक संस्थांचा सहभाग वाढत असताना बँक ऑफ बडोदा आणि ‘बरंच काही फौंडेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने महापालिकेला सुमारे १२ लाख रुपये किमतीचे साहित्य CSRच्या माध्यमातून देण्यात आले.कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे चौक येथे झालेल्या कार्यक्रमात बँक ऑफ बडोदाचे रिजनल हेड प्रकाश जाधव आणि फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संदीप संकपाळ यांनी हे साहित्य आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांच्याकडे सुपूर्द केले.

यामध्ये २० संगणक संच, ५ एलईडी स्क्रीन आणि १३७ एलईडी पथदिव्यांचा समावेश आहे. या साहित्यामुळे महापालिकेचे डिजिटल कामकाज, नागरिक जनजागृती आणि शहरातील प्रकाश व्यवस्था अधिक सक्षम होण्यास मदत होणार आहे. शहराच्या विकासासाठी इतर उद्योग, व्यावसायिक संस्था आणि सामाजिक संघटनांनीही CSRच्या माध्यमातून पुढे यावे, असे आवाहन आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांनी केले.

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here