घरगुती गौरी-गणपती विसर्जनासाठी कोल्हापूर मनपाची यंत्रणा सज्ज..

0
51
Google search engine

कोल्हापूर : घरगुती गौरी-गणपती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर महानगरपालिकेची यंत्रणा सज्ज झाली आहे. महापौर रूपाराणी निकम आणि आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांनी इराणी खण येथील विसर्जन व्यवस्थेची पाहणी करून स्वयंचलित विसर्जन यंत्रणेची चाचणी घेतली.

शहरातील १६० कृत्रिम विसर्जन कुंडांतून संकलित गणेशमूर्ती इराणी खण येथे स्वयंचलित यंत्रणेद्वारे विसर्जित करण्यात येणार आहेत. यासाठी ३०० आयशर वाहने, ६५० हमाल आणि अडीच हजारांहून अधिक मनपा कर्मचारी तीन शिफ्टमध्ये तैनात करण्यात आले आहेत. जेसीबी, डंपर, ट्रॅक्टर, पाण्याचे टँकर, रुग्णवाहिका, तराफे, क्रेन, अग्निशमन दल आणि सीसीटीव्ही यंत्रणाही सज्ज ठेवण्यात आली आहे.

निर्माल्यापासून सेंद्रिय खत निर्मितीसाठी महिला स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य घेण्यात येणार आहे. नागरिकांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करून मनपा प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन महापौर रूपाराणी निकम यांनी केले.

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here