शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी कौस्तुभ गावडे प्रयत्नशील राहतील – राजे समरजितसिंह घाटगे

0
7
Google search engine

कागल : शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी विश्वासाने कौस्तुभ गावडे यांना उमेदवारी दिली. पुणे विभागातील पाचही जिल्ह्यांतील शिक्षकांनी त्यांना पाठबळ दिल्याने त्यांची विधान परिषदेतील सर्वांत तरुण आमदार म्हणून निवड झाली. गावडे हे अभ्यासू व्यक्तिमत्त्व असून शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी ते प्रभावीपणे प्रयत्न करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आमदार कौस्तुभ गावडे यांनी राजे समरजितसिंह घाटगे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या राजर्षी शाहू स्टार्टअप मिशनसह कोल्हापूरच्या विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांचे कौतुक केले. कोल्हापुरातील प्रस्तावित आयटी पार्कसाठी आवश्यक तंत्रज्ञान आणि प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध व्हावे, यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना आपले सहकार्य राहील, असे त्यांनी सांगितले. शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत घाटगे यांच्या विचारांशी जोडलेल्या शिक्षकांनी दिलेल्या सहकार्यामुळेच विजय साकार झाल्याचेही त्यांनी नमूद केले.

यावेळी शाहू उद्योग समूहाचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे, कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण, सर्व संचालक, उपनगराध्यक्ष जयवंत रावण, नगरसेवक आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here