गोकुळ’मध्ये सहकार सप्ताह विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा…

0
58
Google search engine

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) यांच्या वतीने भारत सरकारच्या सहकार मंत्रालयाच्या आवाहनानुसार दि. २९ जून ते ६ जुलै २०२६ या कालावधीत सहकार सप्ताह विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.

यानिमित्त गोकुळच्या विविध प्रकल्पांमध्ये औषधी वनस्पतींचे वृक्षारोपण करण्यात आले. तसेच अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रा. डॉ. अनिल कारंजकर यांचे “सहकार व्यवस्थापन व त्यापुढील आव्हाने” या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले. प्रशासक सागर बलकवडे यांनी सहकारासोबत पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी अधोरेखित करत भविष्यातही असे उपक्रम सातत्याने राबविण्यात येतील, असे सांगितले.

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here