NEET-UG कथित घोटाळ्याविरोधात दिल्लीत आंदोलन तीव्र; राजू शेट्टी, महादेव जानकरांचा पाठिंबा…

0
48
Google search engine

नवी दिल्ली : NEET-UG वैद्यकीय प्रवेश परीक्षेतील कथित घोटाळा आणि शिक्षण व्यवस्थेतील अनियमिततेविरोधात जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांचे आंदोलन तीव्र झाले आहे. आंदोलनस्थळी राजू शेट्टी आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी अभिजीत दिपके यांची भेट घेऊन आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला.

यावेळी राजू शेट्टी यांनी केंद्र सरकारवर टीका करत परीक्षा घोटाळ्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली. दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी आंदोलनाला पाठिंबा देत सुरू केलेले आमरण उपोषण प्रकृती खालावल्याने रुग्णालयात हलवल्यानंतरही सुरूच ठेवले आहे. जंतर-मंतरवरील आंदोलनाला देशभरातील विद्यार्थी, नागरिक आणि विविध सामाजिक संघटनांचा वाढता पाठिंबा मिळत असून आंदोलनकर्त्यांसाठी अन्न व वैद्यकीय सुविधाही स्वयंसेवी पद्धतीने उपलब्ध करून दिल्या जात आहेत.

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here