प्रसारमाध्यम l दिग्विजय माळकर
भारताच्या राजकीय नकाशावर मोठा बदल घडवत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपने पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक विजय नोंदवला आहे. गेल्या १५ वर्षांपासून सत्तेत असलेल्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि त्यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाच्या सत्तेला मोठा धक्का बसला आहे.
या निकालामुळे पश्चिम बंगालमध्ये प्रथमच भारतीय जनता पक्ष (भाजप) सत्तास्थापनेच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. राज्याच्या राजकीय इतिहासात हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
पाच राज्यांच्या निवडणुकीत बंगाल केंद्रस्थानी
पश्चिम बंगालसह आसाम, तामिळनाडू, केरळ आणि पुद्दुचेरी या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे निकाल नुकतेच जाहीर झाले. यामध्ये पश्चिम बंगालमधील लढत सर्वाधिक चर्चेत होती.
भाजपचे नेते सुवेंदू अधिकारी यांच्या आक्रमक प्रचारामुळे तृणमूल काँग्रेसला मोठा फटका बसला. त्यांच्या रणनीतीमुळे भाजपने ममता बॅनर्जींच्या बालेकिल्ल्यात घुसखोरी करत निर्णायक आघाडी घेतली.
इतर राज्यांतील स्थिती
आसाममध्ये भाजपने आपली सत्ता कायम राखली
पुद्दुचेरीमध्ये एनडीए सरकार स्थापनेची शक्यता
दक्षिणेकडील राज्यांमध्ये मिश्र निकाल
आंतरराष्ट्रीय माध्यमांची दखल
या निकालांची दखल जागतिक माध्यमांनीही घेतली आहे:
पाकिस्तानमधील डॉन ने मोदींच्या राजकीय ताकदीवर भर दिला. असे म्हंटले

ब्रिटनच्या बीबीसी न्यूज ने बंगाल जिंकणे हे कठीण राजकीय आव्हान असल्याचे म्हटले
अमेरिकेच्या न्यूयॉर्क टाइम्स ने या निकालाला मोदींच्या हिंदू राष्ट्रवादी पक्षाने विरोधकांचा बालेकिल्ला जिंकला असे संबोधले.

बांगलादेशच्या ढाका ट्रिब्यून ने भाजपच्या पहिल्या संभाव्य सरकारला ऐतिहासिक ठरवले राष्ट्रीय राजकारणावर परिणाम
या विजयामुळे भाजपची राष्ट्रीय पातळीवरील पकड अधिक मजबूत झाली आहे. प्रादेशिक पक्षांच्या वर्चस्वाला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. वाढलेल्या मतदानामुळे बंगालच्या राजकारणात मोठा बदल घडल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.






