प्रसारमाध्यम l सुनंदा नाईक
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) येथे झालेल्या आढावा बैठकीत अध्यक्ष नाविद मुश्रीफ यांनी संघाच्या कामगिरीचा सविस्तर आढावा मांडत नफ्यासंदर्भातील अनेक मुद्दे स्पष्ट केले. गोकुळने केलेल्या कामकाजाची दिशा योग्य असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
बैठकीदरम्यान शिवाजी पाटील यांनी केलेल्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना मुश्रीफ म्हणाले की, त्यांनी कधीही सांगावं आम्ही उत्तर देण्यासाठी तयार आहोत. त्यांच्या सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरे दिली जातील.” मात्र, आरोपांवर थेट शब्दयुद्ध टाळत त्यांनी संयमित भूमिका घेतली. यावेळी माध्यमांनि विचारलेल्या अनेक प्रश्नांवर गोकुळचे अध्यक्ष नवीन मुश्रीफ यांनी स्पष्टीकरण देण्याचे टाळलं.
यावेळी बोलताना मुश्रीफ यांनी वारंवार गोकुळ हा दूध उत्पादक शेतकऱ्यांचा स्वतःचा संघ असल्याचे अधोरेखित केले. संघाच्या निर्णयांमध्ये आणि कामकाजात शेतकऱ्यांचे हित केंद्रस्थानी असल्याचे सांगत त्यांनी सभासदांचा विश्वास कायम ठेवण्यावर भर दिला.






