गोकुळच्या एकमुखी आणि दिशादर्शक विकासासाठी शाहू शेतकरी समविचारी पॅनेलला साथ द्या…

0
10
Google search engine

कोल्हापूर: आजरा तालुक्यात शेतकरी, दूध उत्पादक व ठरावधारकांच्या भेटी; एकमुखी नेतृत्वाची गरज व्यक्त
आजरा, दि. २६ ऑगस्ट २०२६ : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज आजरा तालुक्यातील शेतकरी, दूध उत्पादक आणि ठरावधारकांच्या भेटी घेऊन आमदार सतेज पाटील यांनी संवाद साधला. गोकुळच्या आगामी वाटचालीसाठी एकमुखी आणि सक्षम नेतृत्वाची आवश्यकता असून, संघाच्या सर्वांगीण विकासासाठी शाहू शेतकरी समविचारी पॅनेलला पाठिंबा द्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

या दौऱ्यात जिल्हा परिषद सदस्य सुधीरभाऊ देसाई, उदय पोवार, रणजीत देसाई, शिवसेना (ठाकरे) जिल्हाप्रमुख सुनील शिंत्रे, भाजपचे ग्रामीण उपाध्यक्ष जयवंत सुतार, संभाजी पाटील, युवराज पाटील आणि अनिकेत चराटी यांच्यासह प्रमुख नेत्यांची, दूध उत्पादकांची तसेच ठरावधारकांची भेट घेण्यात आली.

गोकुळच्या पुढील २५ वर्षांचा विचार करून संघाच्या विकासासाठी दिशादर्शक भूमिका घेणे आवश्यक आहे. दूध उत्पादक संस्था आणि उत्पादकांना न्याय देण्यासाठी तसेच गोकुळची प्रगती अधिक वेगाने करण्यासाठी संघामध्ये एकमुखी नेतृत्व असणे गरजेचे आहे. त्यामुळे गोकुळच्या उज्ज्वल भविष्यासाठी शाहू शेतकरी समविचारी पॅनेलच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे, असे आवाहन करण्यात आले.

या दौऱ्यात राहुल देसाई, सत्यजित जाधव, रणजितसिंह पाटील, श्रीमती अंजनाताई रेडेकर, अभिजीत तायशेटे, विद्याधर गुरबे, सचिन घोरपडे, शामराव देसाई, प्रकाश वासकर, विश्वनाथ करंबळी, एम. डी. देसाई, विजय सावेकर, स्वागत परुळेकर, दशरथ अमृते, राजू होलम, अंकुश पाटील, विजय पाटील, किरण कांबळे, नौशाद बुडेखान, निसार लाडजी, आशेद सोनेखान, महादेवराव हेब्बाळकर, अनिल फडके, नंदकुमार सरदेसाई यांच्यासह शेतकरी व ठरावधारक मोठ्या संख्येने सहभागी झाले.

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here