प्रसारमाध्यम l दिग्विजय माळकर
वाढता तणाव आणि घडलेल्या महत्वाच्या घटना थोडक्यात….
१) इस्रायलने इराणमधील नागरिकांना रेल्वे आणि ट्रॅकपासून दूर राहण्याचा इशारा दिला
२) ट्रम्प यांनी इराणच्या वीज प्रकल्प आणि पायाभूत सुविधांवर हल्ल्याची धमकी दिली
३) होर्मूज सामुद्रधुनी बंद असल्यामुळे तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली
सोमवारी इराण आणि इस्रायल यांच्यात पुन्हा एकमेकांवर हल्ले केले गेले. दरम्यान, इराण ने Strait of Hormuz पुन्हा उघडण्यास आणि युद्धविराम करार स्वीकारण्यास नकार दिला आहे. हा निर्णय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांनी दिलेल्या अंतिम मुदतीच्या आदल्या दिवशी घेण्यात आला.
ट्रम्प यांनी इराणला इशारा दिला होता की, जर त्यांनी अमेरिकेच्या अटी मान्य केल्या नाहीत, तर संपूर्ण देश एका रात्रीत उद्ध्वस्त केला जाऊ शकतो.
पाकिस्तानची मध्यस्थी निर्णायक टप्प्यात
दरम्यान, पाकिस्तानमध्ये इराणचे राजदूत यांनी सांगितले की, इस्लामाबादकडून सुरू असलेले मध्यस्थीचे प्रयत्न महत्त्वाच्या आणि संवेदनशील टप्प्यावर पोहोचले आहेत.युद्ध थांबवण्यासाठी सकारात्मक चर्चा सुरू असल्याचे संकेत मिळत आहेत.
अमेरिकेचा प्रस्ताव आणि इराणची भूमिका
अमेरिकेने पाकिस्तानच्या माध्यमातून एक प्रस्ताव दिला होता:
तात्काळ युद्धविराम
होर्मूज सामुद्रधुनीवरील अडथळे हटवणे
१५ ते २० दिवसांत व्यापक शांतता चर्चांची सुरुवात मात्र, इराणने हा प्रस्ताव नाकारला आणि १० मुद्द्यांचा स्वतःचा प्रस्ताव मांडला तो असा की
प्रादेशिक संघर्ष समाप्त करणे
होर्मूज सामुद्रधुनीत सुरक्षित मार्ग
निर्बंध हटवणे
पुनर्बांधणी योजना






