प्रसारमाध्यम l दिग्विजय माळकर
जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने वालावलकर ट्रस्ट हॉस्पिटल कोल्हापूर येथे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांद्वारे नागरिकांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
कार्यक्रमादरम्यान उपस्थित डॉक्टरांनी नागरिकांना नियमित आरोग्य तपासणीचे महत्त्व, संतुलित आहाराची गरज आणि बदलत्या जीवनशैलीत स्वतःची योग्य काळजी घेण्याबाबत मार्गदर्शन केले. निरोगी राहण्यासाठी जीवनशैलीत सकारात्मक बदल आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाला वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांसह सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनीही उपस्थिती दर्शवली. संतोष कुलकर्णी, डॉ. विरेंद्र वनकुंद्रे, डॉ. आर्यन गुणे, डॉ. जमादार, डॉ. दिव्या, ज्योती तावरे, आसावरी सुतार, मनीषा रोटे, राजेंद्र मकोटे, सुनंदा नाईक, ज्योती भोसले तसेच पत्रकार असोसिएशन ऑफ कोल्हापूरचे पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी आरोग्यदायी सवयी अंगीकारण्याचा संकल्प करण्यात आला असून, समाजात आरोग्यविषयक जनजागृती अधिक प्रभावीपणे राबविण्याचे आवाहन करण्यात आले.






